ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा कालावधी दिनांक 13 ऑगस्ट 2026 ते दिनांक 12 सप्टेंबर 2026 सायंकाळी 6:00 असा राहील.
आपले सरकार सेवा प्रदान करण्यासाठी सन 2026 च्या सुधारित जाहिरातीस अनुसरून मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेबाबत.... Click here
मेंबर लॉगिन

अर्ज भरण्याची प्रक्रिया

आपले सरकार सेवा केंद्र साठी
-*आवश्यक कागदपत्रांची यादी *-

  1. पासपोर्ट साईज फोटो
  2. इयत्‍ता 12 वी उत्‍तीर्ण असलेबाबत गुणपत्रक/प्रमाणपत्र,पदवी, पदव्‍युत्‍तर उत्‍तीर्ण असल्‍यास गुणपत्रक/प्रमाणपत्र (केवळ उत्‍तीर्ण असल्‍यास नमुद करावे. पदवी/पदव्‍युत्‍तर अ‍भ्यासक्रमास प्रवेश असल्‍यास नमुद करु नये)
  3. आधार कार्ड प्रत
  4. पॅन कार्ड प्रत
  5. Common Service Centre ID Certificate
  6. ज्‍या भौगोलिक क्षेत्रासाठी अर्ज करावयाचा आहे, त्‍या भौगोलिक क्षेत्रात रहिवास असलेबाबतचा पुरावा (आधार कार्ड व्यतिरिक्त खालीलपैकी एक पुरावा जोडावा)
    • ग्रामपंचायतीचा दाखला
    • तहसिलदार रहिवास प्रमाणपत्र
    • मतदार ओळख पत्र
    • शिधापत्रिका
    • ग्रामपंचायत/नगरपंचायत/नगरपरिषद महानगरपालिका मालमत्‍ता पत्रक
  7. संगणक अर्हता (MS-CIT / CCC)व डिजिटल साक्षरता असल्‍यास प्रमाणपत्र
  8. पायाभूत सुविधा -
    • स्वमालकीच्या जागेचे शॉप ऍक्ट लायसन्स / मालकी हक्काचा पुरावा (७/१२ किंवा मालमत्ता पत्रक)
      किंवा
      जागा भाड्याने घेतली असल्यास कायदेशीर नोंदणीकृत भाडे करारनामा किंवा रु. १००/- च्या स्टँम्प पेपरवर करारनामा
    • दुकानाचा असा जिओ टॅग फोटो ज्यामध्ये संगणक, प्रिंटर , स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, इंटरनेट, वीज बॅकअप, सीसीटीव्ही इत्यादी बाबी स्पष्ट दिसतील (Interior)
    • दुकानाचा असा जिओ टॅग फोटो ज्यामध्ये बाहेर लावलेला मराठीतील नावाचा फलक स्पष्ट दिसेल (दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी सुलभ प्रवेश) (Exterior)
  9. आर्थिक क्षमता -
    • लेखापरीक्षक यांनी प्रमाणित केलेले नेटवर्थ प्रमाणपत्र
    • राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा बँकेचे रु. १.०० लक्ष चे सॉलव्हन्सी प्रमाणपत्र
  10. अनुभव -सी.एस.सी/ सायबर कॅफे / बँक ग्राहक सेवा केंद्र चालवत असलेबाबत संबंधित एजन्सीचे प्रमाणपत्र
  11. सामाजिक समावेशकता -
    • ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेबाबत वैद्यकीय दिव्यंगत्व प्रमाणपत्र (Medical Disability Certificate) किंवा युनिक डिसॅबिलिटी आयडी UDID कार्ड
    • माजी सैनिक असलेबाबत Discharge Book / Pension Payment Order ची प्रत
    • स्वयंसहायता गटाचे (बचत गट) सदस्य ओळखपत्र, प्रमाणपत्र
    • महिला असलेबाबत आधार कार्ड पुरावा
  12. चारित्र्य पडताळणी - पोलीस विभागाकडील चारित्र्य प्रमाणपत्र (Police Clearance Certificate)
अटी व शर्ती नोंदणी करा